Ad will apear here
Next
बडोदा बँकेच्या सर्व शाखांमध्ये ‘इंटरऑपरेबिलिटी’ची सुरुवात
मुंबई : बँक ऑफ बडोदा, विजया बँक व देना बँक यांचे एक एप्रिल २०१९पासून विलीनीकरण झाले. वाढलेल्या ग्राहकसंख्येमुळे ग्राहकांना जास्तीत जास्त सोयीसुविधा मिळाव्यात या उद्देशाने बँकेने १ जून २०१९ पासून बचत व चालू खात्यांच्या बाबतीत सहा महत्त्वाच्या बँकिंग सेवांच्या इंटरऑपरेबिलिटीची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. 

या सहा सुविधांमध्ये ५० हजार रुपयांपेक्षा कमी रोख रकमेचा भरणा, ५० हजार रुपयांपेक्षा कमी रोख रक्कम काढणे, एक लाख रुपयांपर्यंतच्या रकमेचे त्वरित आंतर-शाखा ट्रान्सफर, संपूर्ण विस्तारित नेटवर्कमध्ये सर्व शाखांमध्ये धनादेशाच्या स्टॉप पेमेंट' सूचनेचे नोटिंग, खात्यामध्ये केल्या गेलेल्या शेवटच्या दहा व्यवहारांची खात्री करून घेणे आणि खात्यामधील शिल्लक रक्कम जाणून घेणे यांचा समावेश आहे.

आता ग्राहकांना २४ हजारपेक्षा जास्त ठिकाणी सेवांच्या उपलब्धतेमुळे एकत्रित नेटवर्कमार्फत अधिक विशाल भौगोलिक विस्ताराचे लाभ मिळत आहेत. ग्राहकांना अधिक सुविधाजनक ठरत असलेल्या विस्तारित नेटवर्कमध्ये साडेनऊ हजारांपेक्षा जास्त शाखा, १३ हजार ४०० पेक्षा जास्त एटीएम्स व बाराशेपेक्षा जास्त ई-लॉबीजचा समावेश आहे.

भविष्यात सेवांच्या इंटरऑपरेबिलिटीच्या कक्षा वाढविल्या जाव्यात अशी बँकेची योजना आहे. इंटरऑपरेबिलिटी म्हणजे याआधी ग्राहकांचे खाते बँक ऑफ बडोदा किंवा विजया बँक किंवा देना बँक यापैकी कोणत्याही बँकेत असेल, तरी आता ते या सेवांचा लाभ कोणत्याही शाखेमध्ये घेऊ शकतील. याआधी विजया बँक आणि देना बँक असलेल्या व आता बँक ऑफ बडोदामध्ये विलीन केलेल्या सर्व शाखांमध्ये सेवांची इंटरऑपरेबिलिटी अजूनपर्यंत सुरू होती तशीच कायम राहील.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZZMCB
Similar Posts
बँक ऑफ बडोदा देशातील दुसरी मोठी सार्वजनिक बँक पुणे : विजया बँक व देना बँक यांचे बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण झाल्याने, एक एप्रिल २०१९ पासून बँक ऑफ बडोदा ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक म्हणून उदयास आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ३० मार्च २०१९ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, विजया बँक व देना बँक यांच्या सर्व शाखा एक एप्रिलपासून
‘बँक ऑफ बडोदा’तर्फे मॅरेथॉनचे आयोजन मुंबई : बँक ऑफ बडोदाने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे अडीच हजार कर्मचाऱ्यांसाठी पाच किलोमीटर सन रन मॅरेथॉनचे आयोजन केले होते. सर्व कर्मचाऱ्यांमध्ये स्नेहाचे नाते तयार करून त्यांच्यात एकीची भावना निर्माण करण्याचा उद्देश मॅरेथॉन आयोजनामागे होता.
बँकांच्या विलिनीकरणाचा अन्वयार्थ देना बँक, विजया बँक आणि बँक ऑफ बडोदा या तीन बँकांचे विलिनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने १७ सप्टेंबर रोजी जाहीर केला. या तिन्ही बँकांच्या विलिनीकरणातून निर्माण होणारी बँक देशातील तिसरी सर्वांत मोठी बँक असेल. या निर्णयाचा अन्वयार्थ काय आहे, याचा आढावा घेणारा हा लेख...
‘बँक ऑफ बडोदा’तर्फे कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी पाळणाघर मुंबई : भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने त्यांच्या मुंबईतील कॉर्पोरेट ऑफिसच्या परिसरात आपल्या कर्मचाऱ्यांसाठी पाळणाघर सुविधा सुरू केली आहे. अशी सुविधा देणारी ही देशातली पहिली बँक आहे. महिला दिनाचे औचित्य साधून बँकेच्या या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language